CropSpy

  • Home
  • About
  • Features
  • Services
  • Pricing
  • Contact
Login
Our Journey

त्रिकोण

पिकावर किड व रोगांचा हल्ला होण्यासाठी ३ गोष्टींची गरज भासते. जे त्रिकोणाच्या माध्यमातुन मांडले जाते.

त्रिकोणाची खालीची बाजु म्हणजे पिक असते, त्रिकोणाची डावी बाजु म्हणजे वातावरणातील तापमान, आर्द्रता, पाऊस, हवेचा वेग यासारखे घटक असतात.

त्रिकोणाची उजवी बाजु हि रोगाची सुप्तावस्थेतील बिजाणु, किडीचे कोष, प्रौढ, पतंग तसेच आसपास रोग किंवा किडीची सक्रिय उपस्थिती देखिल या बाजुवर मांडली जाते.

ज्या प्रमाणे त्रिकोणाच्या तिनही बाजु एकमेकांशी जोडल्या गेल्या तरच त्रिकोण पुर्ण होतो त्याच प्रमाणे, पिकावर रोगाची लागण किंवा किडीचा हल्ला होण्यासाठी तिनही बाजु एकमेकांशी जोडल्या जाणे गरजेचे असते. यापैकी समजा पिक नसेल तर रोग येणार नाही, वातावरण पोषक नसेल तर रोग येणार नाही तसेच रोग व किडीचे ईनॉक्युलम नसतील तर रोग येणार नाही.

Our Mission

हवामान

त्रिकोणाची एक बाजु जी आहे हवामान ती पिक आणि रोग व किडिंवर प्रत्यक्ष परिणाम करते. त्याबाबत जर माहीती मिळत गेली तर रोग, किड व पिक यांच्या साठी हवामान अनुकुल आहे कि प्रतिकुल याबाबत माहीती मिळते. त्यानुसार किड व रोग कमजोर असतांना आणि हवामान त्यांना पोषक असतांना कशा पध्दतीने उपाययोजना करयाच्या ते ठरवणे शक्य होते.

रोग व किडींचा त्रिकोणातील हवामान या घटकांचा विचार केल्यास काही बाबी आपण पिकावर किड आणि रोगांचा हल्ला होण्याच्या आधी जाणुन घेवु शकतो. ज्यामुळे रोगाच्या आणि किडिच्या येण्याच्या आधी सध्या उपलब्ध असलेल्या अनेक प्रकारच्या उपाययोजनांचा वापर करता येण्या सारखा आहे.

जसे की, रसशोषक किडिंच्या साठी वातावरण पोषक तयार होत असेल आणि पिकाची लागवड झालेली असेल तर आधीच आपण चिकट सापळे वापरु शकतो. तसेच काही प्रतिबंधकात्मक उपाययोजना असतील तर त्या रासायनिक किंवा जैविक रुपात वापरु शकतो.

रोगाच्या प्रती वातावरण पोषक तयार होत असेल तर संरक्षक म्हणुन काम करणारे बुरशीनाशक- रासायनिक किंवा जैविक यांचा वापर करु शकतो.

पिकाच्या रोग व किड प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी जे अन्नद्रव्य काम करते त्याचा वापर करु शकतो, किंवा ज्यामुळे अशी प्रतिकारक शक्ती कमी होते त्याचा वापर टाळु शकतो.

हवामान कोणत्या बाबींमुळे बदलते?

तापमान, आर्द्रता हे घटक एखाद्या ठराविक विभागात फारसे मोठ्या प्रमाणात बदलत नाहीत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात हा शब्द महत्वाचा आहे, आणि तो आपण देखिल जाणिवपुर्वक वाचावा जेणे करुन पुढील माहीती समजणे सोपे जाईल.

Our Mission

हवामानाचे घटक बदलण्यात खालिल घटकांचा समावेश असतो.

त्या जागेची समुद्र सपाटी पासुन ची उंची.

किती अंतरावर लहान मोठे डोंगर आहेत.

पाण्याचे स्रोत जसे की, नदी, तलाव, कालवा यांची उपस्थिती किती आहे.

वनस्पतींची तसेच पिक उपस्थिती कशी आहे.

समजा एखाद्या १०-२० किमी परिसरात जो समुद्र सपाटीपासुन एक समान उंचीवर आहे, त्या पुर्ण परिसरात लहान-मोठे डोंगर नाहीत, तसेच पाण्याचे स्रोत नाहीत आणि तेथे जंगल देखिल नाही तर अशा प्रसंगी वातावरणाच्या तापमान आणि आर्द्रता यात फार मोठा फरक पडत नाही.

डोंगराच्या पायथ्याशी, टोकावर यो दोन्ही ठिकाणी तापमानात फरक असतो. डोंगर हा डोळ्यांना दिसणारा असतो आणि तो अनेकदा डोळ्यांना दिसत देखिल नाही. जसे की, आपण जसे जसे मालेगाव वरुन नाशिक कडे प्रवास करत असतो, तसे आपण चढाकडे जात असतो. अगदी लांबुन बघितले तर चांदवड ते नाशिक जवळपास डोंगरावर वसलेला भाग आहे. हे असे बदल जे डोळ्यांना दिसत नाहीत ते मोजण्यासाठीच समुद्र सपाटी पासुनची उंची हा शास्रिय विषय ग्राह्य धरला जातो.

Our Mission

पिक, रोग व किड

रोगांच्या रुजण्यासाठी, त्यांची वाढ होण्यासाठी, किडिंची वाढ होण्यासाठी एक ठराविक तापमान आणि आर्द्रता गरजेची असते. त्यांच्या पलिकडे तापमान व आर्द्रता वाढली अथवा कमी झाल्यास रोगव किडीच्या वाढीवर प्रतिकुल परिणाम होतो. हवामानात बदल झाला म्हणुन ते काही क्षणात मरणार किंवा अचानक वाढणार नाहीत. रोग व किड हे देखिल सजिव असल्या कारणाने ते देखिल वातावरणाच्या फेरबदलांना प्रतिकार करणार आहेतच, पण यात त्यांची बरिच उर्जा खर्च झाल्याने त्यांची नुकसान करण्याची क्षमता देखिल प्रभावित होते.

समजा एखादा रोग हा 10 ते 25 डिग्री तापमान आणि 75 ते 90 टक्के आर्द्रता या वातावरणात रुजु शकतो आणि वाढु शकतो. जर पिक असेल आणि रोगाचा ईनॉक्युलम असेल तर तो रोग ११ डिग्री ते 24 डिग्री असे वेगवेगळे तापमान असलेल्या सर्वच ठिकाणी येवु शकतो. अस देखिल होणार नाही की तापमान 8 आहे किंवा 30 झाले तर तो एकदम येणारच नाही. ईनॉक्युलम असेल तर अशा हानीकारक वातावरणात देखिल तो प्रयत्न करेल की त्याचे जीवन कसे सुरु करता येईल किंवा जास्त दिवस जगता येईल. नेमकी हिच वेळ जर कळाली तर रोगास पुर्णपणे पोषक वातावरण नसेल तर रोग नियंत्रण करणे सोपे जाते.

रोगासाठी सर्वच घटक पोषक झाले तर तो रोग आटोक्यात आणणे कठिण जाते, कारण त्याचा मल्टिप्लाय होण्याचा वेग आणि नियंत्रणाच्या उपाययोजना यांची सांगड घालणे कठिण जाते. रोगाची लक्षणे पिकावर दिसण्यासाठी रोगाची लागण झाल्यानंतर 5 ते 45 दिवस लागतात. रोगानुसार यात बदल होत असतो.

पिकाची लागवड जर परिसरात किंवा शेतात वारंवार होत असेल आणि रोगाची लक्षणे जर पुर्वी देखिल दिसत आली आहेत तर नविन हंमात तो रोग येण्याची शक्यता कित्येक पट वाढते. अशा वेळी रोगाची सुरवात होण्याची माहीती हवामानाच्या आधारे मिळाली तर वेळीच प्रतिबंधकात्मक उपाययोजना करणे शक्य होते. अशीच प्रक्रिया पिकाबाबत असते, जेव्हा पिक व किड हानीकारक वातावरणाशी लढत असते तेव्हा देखिल त्याची बरिचशी उर्जा त्या वातावरणाशी लढण्यात खर्च होत असते.

Frequently Asked Questions

जे शेतकरी वेदर स्टेशन घेवु ईच्छित नाही किंवा कमी क्षेत्र असल्यामुळे तसे घेणे संयुक्तिक नाही अशा शेतकरी वर्गाला सॅटेलाईट सेवेच्या माध्यमातुन जी हवामानाची माहीती मिळते ती माहीती संगणकांस आधीच शिकवलेल्या माहीतीच्या सोबत संलग्न करुन रोग व किडींच्या बाबतीत ५ वेगवेगळ्या स्तरांच्या माध्यमातुन माहीती दिली जाते.

क्रॉपस्पाय हे अमेरिकेच्या विजुअलक्रॉसिंग संस्थे सोबत काम करते. त्यांच्या व्दारा 50 ते 70 किमी परिसरातील हवामान माहीती संकलित केली जाते. जी सॅटेलाईट आणि स्थानिक वेदर स्टेशन व्दारा गोळा केलेल्या माहीतीच्या आधारे असते. ज्याठिकाणी भौगोलिक परिस्थिती फार मोठ्या प्रमाणात बदलत नाही अशा ठिकाणी हि माहीती बरिच अचुक सिध्द होते.

क्रॉपस्पाय हे लघु व मध्यम शेतकरी बांधवांना जवळपास 35 पिकांवरिल रोग व किडींच्या आगमनाबाबत आगाऊ सुचना देण्याचे काम करते. ज्यात शेतकरी शेतात फेरफटका मारत असतांना नेमके कशाचे निरिक्षण करायचे हे आधीच जाणुन असल्याने अधिक बारकाईने तशी लक्षणे बघु शकतो. तसेच आधीच सांगितल्या प्रमाणे जर ठराविक पिकाची लागवड किंवा त्या गटातील इतर पिकाची लागवड जर वारंवार होत असेल तर किड-रोग येण्याची शक्यता गृहीत धरुन प्रतिबंधकात्म उपाययोजना करु शकेल.

क्रॉपस्पाय माहीती चुकीची अथवा बरोबर देत आहे की नाही, हे असे मुल्यांकन खरे तर चुकिचे आहे. वास्तविक ते कोणत्याही वेदर आधारित माहीती देणा-या सुविधे बाबत देखिल चुकिचे आहे. आपण आधीच बघितले की पिकावर किड-रोग येण्यासाठी त्रिकोण तयार होणे गरजेचा आहे.

शेती आणि शेतकरी हे केंद्र स्थानी मानुन क्रॉपस्पाय तयार केले गेले आहे. रोग, किड आणि पिक हे तिनही घटक सजिव आहेत. सजिवाचा मुळ गुणधर्म हा, समोर आहे त्या परिस्थीतीशी झगडुन कसे जिवंत राहता येईल आणि पुढची पिढि कशी तयार करता येईल हा असतो. अशा वेळी आपण आधी देखिल बघितले की, तापमानात बदल झाला म्हणुन लगेच ते जिवन संपवत नाहीत. अशा गोष्टी विचारात घेवुन क्रॉपस्पाय, रोग-किडी साठी जर हवामानाचे सर्व घटक पोषक असतील तर एक वेगळा अलर्ट आणि जसे जसे घटक कमी पोषक होत जातील तशी धोक्याची पातळी कमी करत जावुन त्यानुसार माहीती देते.

समजा एखाद्या रोगाबाबत मध्यम किंवा कमी अशी सुचना आहे तर ती योग्य वेळ असते, की ज्या रोग किंवा किडीबाबत माहीती मिळाली आहे ती शेतात दिसत आहे का हे बघणे. पुर्वीचा अनुभव जर असेल की रोग-किड येतेच तर गरज भासली तर प्रतिबंधकात्मक उपाययोजना करणे. आपण आधीच बघितले की, रोग-किड यांचा जो त्रिकोण असतो तो असतो की, हवामान, रोगाचे,किडीचे ईनॉक्युलम आणि पिक (होस्ट) असेल तरच लागण होणार आहे. आपला प्रयत्न हा आहे की, या तिघांपैकी पिक आणि हवामान आपल्याला माहीत असेल तर आपण लवकर सतर्क होवु शकतो. जर पिकाची लागवड योग्य हंगामात आहे, ईनॉक्युलम नाही तर हवामान असुन देखिल रोग-किड शेतात दिसणार नाहीत, जरी ते क्रॉपस्पाय सांगत असेल तरी देखिल.

क्रॉपस्पाय हि सेवा आपण घरात बसुन, शेतात न जाता परस्पर फवारणीचे निर्णय घेण्याईतकी नाही, हे आम्ही अगदी ठामपणे सांगतो. अनेक प्रकारच्या कामांचा ताण असतांना शेतात फेरफटका मारत असतांना शेतात नेमके काय बघायचे हे अनेकदा लक्षात राहत नाही अशा प्रसंगी क्रॉपस्पाय मदतनीस म्हणुन सिध्द होते.

आम्ही 2024 च्या जुन पासुन या विषयावर वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या स्थानिक अॅग्रीप्लाझा वेदर स्टेशन, सॅटेलाईट सेवा आणि वेदर आधारित सेवा यांचा अभ्यास करत आहोत. क्रॉपस्पाय यंत्रणा वापरुन सल्लागार, शेतकरी आणि कंपनी प्रतिनिधी यांना काही घटना आधी कळण्यास मदत मिळु शकते ज्याच्या सहाय्याने योग्य ती उपाययोजना वेळीच करणे शक्य होईल. तसेच जेव्हा हवामान फार हानीकारक होते आहे तेव्हा उपलब्ध अनेक पर्यायातुन किफायतशीर मात्र अधिक परिणामकारक असा निवडता येणे शक्य होते. हे अस नाही की, रोग-किड येणारच आहे किंवा अजिबात येणार नाही. येणार सांगितले तर का आला नाही? क्रॉपस्पाय जाणते की ते सजिवांशी निगडित काम करत आहे त्यामुळे ते रोग-किड येणार नाही कि येणार आहे हे फार विचार करुन सांगते. शिवाय क्रॉपस्पाय हे तिव्रतेच्या टप्प्यांच्या माध्यमातुन माहीती देते, ज्यामुळे नियंत्रणाची योग्य वेळ ठरवणे यात मदत मिळते.

क्रॉपस्पाय ची माहीती बघण्यासाठी आपणास क्रॉपस्पाय ची बेवसाईट किंवा त्याचे एंड्रॉईड अॅप आपण डाऊनलोड करुन ती माहीती बघु शकतात. शिवाय आपणांस कामाच्या गर्दीत नोटिफिकेशन व्दारा ती माहीती बघावी अशी सुचना देखिल आठवड्यातुन 2 वेळेस दिली जाते. तसेच ईमेल च्या माध्यमातुन देखिल तशी माहीती आपणास आपोआप पाठवली जाते.

रोग व किड बाबत माहीतीच्या व्यतिरिक्त, क्रॉपस्पाय आपणांस रोगाची लक्षणे व किडी चे फोटो उपलब्ध करुन देते ज्यामुळे शेतात निरिक्षण सहज शक्य होते. रोगाच्या किंवा किडीच्या नावावर क्लिक केल्यानंतर आपणास अधिकृत (रोग व किड नुसार) किटकनाशक अथवा बुरशीनाशक यांची ग्रुप नुसार यादी मिळते, ज्यातुन आपण आपल्या सल्लागारांच्या सल्ल्याने योग्य ते किटकनाशक-बुरशीनाशक निवडु शकतात. तसेच ठराविक पिकांसाठी एकंदर कोणती बुरशीनाशके व तणनाशके अधिकृत रित्या (CIB) शिफारस केली आहेत त्याची माहीती मिळवु शकतात. क्रॉपस्पाय मधे आपण आपल्या शेतात केलेल्या कामांच्या नोंदी ठेवु शकतात. जे एक डिजिटल डायरी म्हणुन उपयोगी ठरते.

ही माहीती लिहिते वेळी क्रॉपस्पाय 35 पिकांची माहीती देते. ज्यात 300 रोग व किडींचा समावेश आहे. तसेच वेळोवेळी हि माहीती शेतकरी वर्गाची गरज आणि प्रत्यक्ष परिस्थिती यानुसार अपडेट केली जाते. आपणास अपडेट हे आपोआप मिळतात.

आपणास क्रॉपस्पाय ची माहीती आवडली असेल आणि आपण हि सेवा सुरु करु ईच्छित असाल तर 31 मार्च 2025 च्या विशेष सवलतिचा लाभ घेवुन 1 वर्षाची सभासद फि 375 रु. (31मार्च 2025 नंतर 1250 प्रती वर्ष) भरुन लगेचच आपली सेवा सरु करा. खाली दिलेल्या व्हाटस अप बटनावर क्लिक करा, आपणास क्यु आर कोड मिळेल त्यावर सुरक्षित पेमेंट करा. अथवा नजिकच्या डिलर कडुन कार्ड मिळवा. त्यावर आपला विशेष सिरियल नंबर असेल तो प्रविष्ठ करुन रजिस्टर (Get Started या बटावर क्लिक करुन फॉर्म भरा) करा आणि सेवा त्वरित सुरु करा.

"अनिश्चिततेच्या अंधारात अंदाजाने चालण्यापेक्षा, योग्य माहितीच्या प्रकाशात योग्य पावले उचलूया!"

Send Whatsapp